मुंबई : नितेश राणेंनी एका व्यक्तीला 12 कोटींचां गंडा घातला असून, यामुळे त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना तुरुंगात टाकणार होते. तसेच मेडिकल कॉलेजला परवानगी मिळावी म्हणून रोज मातोश्रीवर फोन करायचे, असा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर आता भाजप नेते निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
मेडिकल कॉलेजची परवानगी दिल्लीतून येते मातोश्रीतून नाही हे देखील या अडानी खासदाराला माहित नाही, असे म्हणत निलेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. आम्ही सत्तेत असताना एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे विषय घेऊन किती वेळा राणे साहेबांना भेटले हे पण एकदा त्यांनी स्पष्ट करावे. स्व.बाळासाहेब हयातीत असताना राणे साहेबांना फोन करायचे, असा दावा निलेश राणेंनी ट्विट करत केला आहे.
विनायक राऊत मीटर चोर तुझ्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणेंचं काहीही बिघडू शकत नाही. तुझी लायकी मातोश्रीचे बिस्कीट चोरायच्या पलीकडे नाही. बेवडा मुलगा निस्तरता येत नाही म्हणून दुसऱ्याना बोलून काही बदलणार नाही. जनतेने काम करायला निवडून दिले आहे, राणेंवर टीका करायला नाही, अशी जोरदार टीका राणेंनी केली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
