आटपाडी : आटपाडी पोलिसांची दमदार कामगिरी सुरूच असून आज शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्यातील इलेक्ट्रीक मोटरी चोरणाऱ्या चोरट्यांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून इलेक्ट्रीक मोटरी ताब्यात घेण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजेवाडी ता. आटपाडी येथील शेतकरी भानुदास लक्ष्मण हेगडे यांच्या राहत्या घरातुन चोरल्याची तक्रार त्यांनी आटपाडी पोलीस ठाणे येथे दिनांक दि. ०३/१२/२०२०. रोजी दाखल केली होती. सदर गुन्हयात अज्ञात आरोपी यांनी फिर्यादी भानुदास लक्ष्मण हेगडे रा राजेवाडी ता आटपाडी यांचे रहाते घरातुन ८०००/- रु किं.ची इलेक्ट्रीक पाच एच पी ची पाण्यातील मोटर चोरुन नेली होती.
याबाबत आटपाडी पोलिसांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वरील फिर्यादीचे इलेक्ट्रीक पाण्यातील मोटर हि भाऊसाहेब जालींदर साबळे वय ४० रा राजेवाडी व राजु गौतम काटे वय २८ रा राजेवाडी ता आटपाडी यांनी चोरुन नेली आहे. सदरबाबत वरील दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरची इलेक्ट्रीक मोटर ही आम्ही दोघांनी मिळुन चोरली असुन सदरची मोटर ही आमचेकडे दारु पिण्यासाठी पैसे नसल्याने ती चोरल्याची कबुली दिली असल्याने दोघांना इलेक्ट्रीक मोटरसहीत ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री देवकर, सपोनि सुधीर पाटील, सपोफौ चोरमले, पोना/ विकास जाधव, प्रमोद रोडे यांनी केली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस