मुंबई : आमदार रोहित पवार जामखेड तालुक्यातून जिथून आमदार म्हणून जातात, त्या मतदारसंघात चौंडीला अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पुतळ्याचे अनावरणा दरम्यान केले होते. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. एक व्हिडीओ शेअर करत पडळकरांनी पवारांवर टीका केली आहे.

पडळकर म्हणाले की, स्वयंघोषित ‘जाणता राजा’ उर्फ मा.शरदचंद्र पवार साहेबांनी राजकीय स्वार्थासाठी नवा शोध लावलाय. त्यांनी चक्क त्यांचे ‘लाडके’ रोहित पवार यांच्या मतदार संघात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, असे विधान काल ‘जेजूरी गडा’वरून केले.
शरद पवारांची अहिल्यादेवींवरती किती आस्था आहे? ते यावरूनच अधोरेखित होते. म्हणूनच मी म्हणतोय, ते आपला वापर फक्त राजकारण आणि फक्त राजकारणासाठीच करतात. अशा या ‘प्रस्थापित’ राज्यकर्त्यांचा जाहीर निषेध, असे पडळकर म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
