कल्याण : मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील त्यांच्या जाण्याने आम्हाला फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

“एखादी मजबूरी असेल, इतर काही आमिषांना बळी पडले असतील ही दुदैवी गोष्ट आहे. आम्हाला कारण माहिती नाही. त्यांच्या जाण्याने आम्हाला फरक पडणार नाही. निवडणुका आल्या की साम, दाम, दंड आणि भेद वापरून आपल्या पदरात काही पक्षातील लोक पाडून घ्यायचे. याचाच हा एक भाग आहे,” असेही राजू पाटील म्हणाले.
भाजप शिवसेना युती तुटली आहे. त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे आमच्यातील काही माणसे फोडून जमवाजमाव केली असेल. मला नाही वाटत आगामी काळात त्याचा आम्हाला फरक पडल. जे व्हायचे आहे ते होणार आहे असा इशारा पाटील यांनी दिला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
