कल्याण : ‘ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागरिकांना वीजबिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र आता नागरिकांनी वीजबिल भरलं नसल्याने सरकारने वीज कनेक्शन तोडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सरकारचा फ्यूजच उडाला आहे,’ असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासन पाळण्यात राज्य सरकारला अपयश आलं आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेला दिलेली आश्वासन फोल ठरली असून जनता सरकारला योग्य धडा शिकवणार असल्याचंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
मध्य रेल्वेवर आजपासून सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी लोकलची सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र ही लोकल सेवा सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारची फायदेशीर नसल्याचे विधान चित्रा वाघ यांनी कल्याणमध्ये केले आहे. रेल्वे सुरू होण्याने नोकरदार वर्गाला फायदा होणार नाही, असं त्या म्हणाल्या.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
