मुंबई : माझ्या हाती राज्याचे स्टेअरिंग भक्कम आहे, मध्ये-मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. कार आणि सरकार दोन्ही सुरळीत सुरु आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले होते. या विधानानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात; पण ते कार जेव्हा चालवत असतात तेव्हा सगळं ट्राफिक थांबलेले असते. त्यामुळे ती कार व्यवस्थित चालते. असे सरकार चालवता येत नाही. सरकारकडे ट्रॅफिक सुरुच राहत असते. त्यामुळे याबाबत जनताच त्यांना योग्य उत्तर देईल, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
