अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपोषण करण्याचे जाहीर करुन ते मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून अण्णा यांची भूमिका नेमकी काय आहे?, असा खोचक सवाल केला. त्यांनंतर अण्णा हजारे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
आमच्यापुढे फक्त समाज आणि देश आहे. ज्या वेळी समाज आणि देशासाठी घातक असणारे कृत्य होत असते. त्यावेळी आम्ही आंदोलन करतो. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल,” असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेला दिला. ते राळेगणसिद्धीत बोलत होते. तसेच आजचा अग्रलेख लिहिण्याचं कारण काय सांगा?, मग मी सगळं काही बाहेर काढतो, असंही अण्णा हजारे म्हणाले.
शिवसेनेच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत तो बाहेर काढण्याचाही निर्वाणीचा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला. “तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल,” असं अण्णा म्हणाले. तसेच, भाजप सत्तेवर आल्यानंतर माझे एकूण 6 आंदोलनं झाली, हे आंदोलन आपण विसरलात का?,” असा प्रतिप्रश्नही त्यांनी शिवसेनेला केला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
