मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊतांनी माध्यमांशी संवादा साधताना चिघळलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक वादावर प्रतिक्रिया दिली. बेळगावात परिस्थिती चिघळत असेल तर त्याला जबाबदार केंद्र सरकार आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. केंद्र सरकरला पश्चिम बंगालमधला हिंसाचार दिसतो त्यासंबंधी ते तक्रार करतात. बेळगावात मराठी नागरिकांवर, शिवसेनेच्या कार्यालवर हल्ले होत आहे. त्यामुळे तेथील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे.
बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावं लागेल. मी काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवेदने पाहिली आहेत. बेळगावला महाराष्ट्रात आणायचे ही त्यांची भूमिका आहे. पण सर्वात आधी तिकडच्या मराठी नागरिकांना संरक्षणाची गरज आहे, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कर्नाटकातील दडपशाही विरोधात आवाज आम्ही उठवू. मात्र त्यांनी कठोर पावलं उचलायला आम्हाला भाग पाडलं तर ती पावलं सरकारी नसतील. ती पावलं राजकीय असतील. मग डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस