आटपाडी : आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथील किराणा दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारत ३२ हजाराचा माल लंपास केला तर प्रतिकार करणाऱ्या बाप-लेकांना धारदार शस्त्राने जखमी केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विभूतवाडी येथे यातील फिर्यादी विठ्ठल दादा पावणे यांचे किराणा मालाचे दुकान आहे. दिनांक १५ रोजी रात्री २.०० च्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी दुकानामध्ये कुलम तोडून प्रवेश केला व दुकानातील तसेच फिर्यादीच्या वडिलांच्या खिशातील रोख रक्कम ३२ हजार रुपये घेवून पळ काढला असता फिर्यादी व त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या धारधार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून चोरट्यांनी त्यांना गंभीर जखमी केले. जखमींना म्हसवड येथील खाजगी रुग्णालयात उचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत सदर घटनेचा अधिक तपास सपोनि श्री. पाटील करीत आहेत.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस



