आटपाडी : आटपाडी तालुक्यासाठी वरदान असलेल्या माणगंगा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण कामाचे उद्घाटन आज संपन्न झाले. आर्ट ऑफ लिविंग संस्था, सदगुरु श्री श्री साखर कारखाना राजेवाडी व माणगंगा भ्रमण सेवा बहुउद्देशीय संस्था सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडी ते राजेवाडी माणगंगा नदी पुनर्जीवन खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे.
सदर कामाचे उद्घाटन मतदार संघाचे आमदार अनिल (भाऊ) बाबर, तानाजीराव पाटील,श्री श्री कारखान्याचे चेअरमन श्री राव अंकल, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार सचिन मुळीक, मानगंगा भ्रमण संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ घोंगडे, आर्ट ऑफ लिविंगचे शिक्षक राजू वाघमारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस