आटपाडी : खानापुर व आटपाडी तालुका यांचा जोडणारा घाट म्हणजे भिवघाट. परंतु याच भिवघाटातील सुरक्षा कठड्यांची दुरावस्था झाली असून प्रशासनास याकडे दुर्लक्ष करत असल्याने अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.
कोकण व मराठवाडा यांना जोडणारा भिवघाट हा निम्मा आटपाडी तालुका व निम्मा खानापूर तालुका असा विभागला गेला आहे. याच घाटाच्या निसर्गरम्य ठिकाणी म्हसोबाचे देवस्थान असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जत्रा भरत असतात. तर घाटातुन पुढे जाताना म्हसोबा देवस्थानचे देवदर्शन केल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. त्यामुळे याठिकाणी नेहमी वर्दळ असते.
घाट रस्ता असल्याने दरीच्या बाजूला संरक्षक भिंत (कठडा) बांधण्यात आली आहे. परंतु या संरक्षक भिंतीची (कठडा) दुरवस्था झाली असून ती एका बाजूने संपूर्णपणे पडलेली आहे. भिवघाट वरून खाली येत असताना अगदी म्हसोबा देवस्थानच्या जवळच ही संरक्षक भिंत (कठडा) पडलेली आहे. याच ठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ व तीव्र उतार असल्याने गाड्यांना वेगाने येत असताना. परंतु जर काही गाडीच्या आडवे आले तर गाडी थांबविण्यासाठी घाटाला संरक्षक भिंत असणे गरजेचे आहे. परंतु सदरची भिंत (कठडा) पडल्याने गाडी दरीमध्ये जाण्याचा धोका असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देवून संरक्षक भिंत (कठडा) त्वरित दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अपघाताचा धोका टळू शकतो. अन्यथा याठिकाणी अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस