मुंबई : राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे. तर नव्याने सुरक्षा काही जणांना पुरवण्यात आली आहे. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण आता तापलेले पाहायला मिळत आहे. यावर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे.
दरम्यान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी टीका केली. राज्य सरकारची कोरोना काळातील मोहीम असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वरुन मुख्यमंत्र्यांना देशपांडे यांनी टोला लगावला. ‘वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे “माझे कुटुंब माझी जबाबदारी ” हे वाक्य मुख्यमंत्रांनी एकदम गंभीर्यानी घेतलेले दिसतंय…’ असे ट्विट देशपांडे यांनी केली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
