कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी ‘मी कोल्हापुरात परत येणार’ असं वक्तव्य केले आणि ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले. मग त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मागे राहतील ते कसले नेते….. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना टोला लगावण्याची, चिमटे काढण्याची संधी सोडली अजिबात सोडली नाही. यात आघाडीवर होते ते उपमुख्यमंत्री अजित पवार त्यानंतर नंबर आला तो चंद्रकात पाटील यांचे कट्टर विरोधक हसन मुश्रीफ यांचा त्यांनी आपल्या स्टाईलने चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिले आहे. “चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर सोडून पुण्यातील कोथरुड मतदार संघ निवडला त्याचवेळी त्यांच्यावर टीका झाली होती. आता त्यांनी कोल्हापूरला परत येणार असल्याचं वक्तव्य केल्यामुळे चर्चा तर होणारच. परंतु सर्वाधिक चर्चा झाली ती हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याची. भाजप सत्तेत असताना चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नव्हती. त्यामुळे सध्या हसन मुश्रीफ आता चंद्रकांत पाटील यांची कोंडी करण्याची एक ही संधी सोडत नाहीत.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस
