आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे मुलीने लग्नास नकार दिला म्हणून वडिलांनी रागाच्या भरात मुलीला केलेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटना घडली असून याबाबत आटपाडी पोलीस ठाणे येथे बनपुरीचे पोलीस पाटील हणमंतराव पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी उत्तम महादेव चौगुले रा. बनपुरी याची मुलगी ताई हिने लग्नास नकार दिल्याने आरोपी उत्तम याने तिच्या पाठीत बेडग्याच्या तुंब्याने जबर मारहाण केली. तिला झालेल्या या मारहाणीत तिचा खुन केला.
सदरची घटना कोणाला समजू नये म्हणून ताई हिला ॲटक आला आहे असे भासवून तिच्या मृत्यूचा पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदरचा गुन्हा हा दिनांक १३ रोजी रात्री २१.३० च्या दरम्यान आरोपीचे घरी बनपुरी येथे घडला असून याबाबत आरोपी उत्तम महादेव चौगुले याच्यावर आटपाडी पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. कलम ३०१, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हाचा अधिक तपास हा सपोनि गभाले करीत आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
Join Free Telegram माणदेश एक्सप्रेस