मुंबई : आपल्या पहिल्याच चेंडूवर त्याने पाकिस्तानी सलामीवीराला माघारी धाडले. विश्वचषकसारख्या मोठ्या स्पर्धेत धमाकेदार सुरूवात करणारा टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणजे विजय शंकर हा प्रेमाच्या पिचवर मात्र ‘क्लीन बोल्ड’ झाला.काही खेळाडूंनी कोरोनाकाळात साखरपुडा उरकुन घेतला. त्यात विजय शंकरचा देखील समावेश होता. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याने ही माहिती दिली होती. तर काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही पोस्ट केलेली आहेत.

साखरपुड्याच्या पाच महिन्यांनंतर तो आज विवाहबंधनात अडकला. सध्या टीम इंडिया आणि तामिळनाडू असे दोन्ही संघ क्रिकेट स्पर्धांच्यानिमित्त बायो-बबलमध्ये असल्यामुळे कोणीही क्रिकेटपटू त्याच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. पण सनरायझर्स हैदराबादने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या. विजय शंकर वैशालीशी लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. हैदराबादकडून तो IPL खेळताना दिसणार आहे. त्याला हैदराबादने संघात कायम राखले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
