
आटपाडी : अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी सरकारकडून कोरोनाचा बाऊ केला जात असून कोरोनाचा बाऊ करू आणि आठवड्यातच अधिवेशन गुंडाळु असा सरकारचा विचार असून कोरोना काळात या सरकारने दारूतून जास्त कर मिळतोय म्हणून दारूची दुकाने सुरू केली आणि मंदिरे बंद ठेवली, म्हणून महाविकास आघाडीचे सरकार हे दारुडे सरकार आहे अशी खरमरीत टीका खोत यांनी केली.
आटपाडी तालुक्यातील झरे येथे दौऱ्यावर दरम्यान ते बोलत होते. खोत म्हणाले राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शिवजयंतीवर घालण्यात आलेले निर्बंध, यावरुन माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. हे सरकार चाललं आहे, ते सरकार आंधळे, मुके आणि बहिरे सरकार आहे. एका बाजूला हे सरकार यात्रा काढत आहे, दुसऱ्या बाजूला मंत्र्यांचे दौरे आणि कार्यक्रम होत आहेत. परंतू जनतेचा आवाज गेल्या दोन वर्षांपासून सरकार दाबण्याचे काम करत आहे.
जनता रस्त्यावर येऊ नये, म्हणून काही वेळा हे सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपते, काही वेळा कोरोनाच्या आड दडून बसते. आता तर अधिवेशन तोंडावर आले आहे आणि आता या सरकारला या अधिवेशनातून पळ काढायचा आहे. म्हणून आता सगळीकडे हे सरकार बोंब मारत आहे,कोरोना वाढला आहे.

सहा महिने कोरोना कुठे झोपला होता का? सहा महिने तुम्ही चाचण्याच घेतल्या नाहीत, याचा अर्थ काय आहे. आता अधिवेशनात जनतेचे प्रश्न विरोधी आमदार मांडणार, आपल्याला तोंड द्यावे लागणार, म्हणून हे सरकार कोरोनाचा बाउ हे करत आहे, असा आरोप आमदार खोत यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीबद्दल ते म्हणाले सरकारकडून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत त्यामुळे या सरकारचे “एकचं प्याला”या नाटकाचे वर्णन करावे लागले,आणि हे सरकार दारुडे सरकार असल्याची खरमरीत टीका खोत यांनी केली.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस