नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोश्यारी यांनी भाषणाच्या ओघात थेट राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. थेट राज्यपालांनीच भुजबळांना अप्रत्यक्षपणे ही ऑफर दिल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ निघत आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज नाशिकमध्ये आले होते. सटाणा येथे संत शिरोमणी देवमामलेदार स्मारकाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
माझ्यासाठी सगळेच देवमामलेदार आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी प्रथम प्रणाम करतो. भुजबळांनी संपूर्ण बळ लावलं म्हणून हे स्मारक होत आहे. त्यामुळे भुजबळही सर्वपक्षीय होवोत अशी देवमामलेदारांना प्रार्थना करा म्हणजे सर्व भांडण संपून जाईल आणि तुम्हाला भरघोस निधी मिळेल, असं सांगत राज्यपालांनी थेट भुजबळांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
