नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विमान प्रवासाला परवानगी नाकारण्यावरून भाजप ,नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना सुनावले आहे.

‘राज्यपाल प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दूरध्वनीवर बोलणे झाले. जे काही झालं ते नियमाला धरूनच झालेल आहे. भाजपच्या लोकांनी आरोप करण्याची गरज नाही, राज्यपाल काही भाजपचे नाहीत. ते महाराष्ट्राचे आहेत’, असं राऊत म्हणाले. तसंच, राज्य सरकारने 12 राज्यपाल नियुकत आमदारांची शिफारस केली आहे. पण अजूनही बारा आमदारांच्या नियुक्त्या होत नाहीत हा राज्यघटनेचा सर्वात मोठा अपमान आहे, असा निशाणाही संजय राऊत यांनी राज्यपालांवर साधला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
