जत/प्रतिनिधी : जत-शेगाव रोडवर सोने विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या सोनारांच्या डोळ्यात चटणी टाकून सुमारे 2 कोटी 26 लाख 13,500 रूपयाचे तब्बल साडेचार किलो सोने लुटल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी बाळासाहेब वसंत सावंत रा.पळसखेल ता. आटपाडी यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे. बाळासाहेब सांवत व अन्य एकजण हे गुरुवारी मध्यरात्री बेळगांव हून सोने विक्रीसाठी चारचाकी गाडीतून घेऊन येत होते.
शेगाव दरम्यानच्या माळी वस्तीनजिक त्यांनी लघुशंकेसाठी गाडी थांबविली असता, पाठीमागून आलेल्या अज्ञात चार संशयितानी सांवत व सहकार्याच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना बेदम मारहाण करून गाडीतील 2 कोटी 26 लाख 13,500 रूपयाचे तब्बल साडेचार किलो सोने घेऊन पलायन केले आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे. पोलीसांची पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस