म्हसवड : शासनाने २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करुन नविन अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली. या योजनेत मुळ वेतन अधिक महागाई भत्ता याचे चौदा टक्के शासनाचा सहभाग व दहा टक्के कर्मचाऱ्यांचा सहभाग अशी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात येत आहे.

या अंशदायीन पेन्शन योजना (DCPS )या योजनेतून २००५ पासून कर्मचाऱ्यांची पगारतून कपात सुरु आहे मात्र या कपातीचा २००५ पासून आज पर्यंत जमा होणारी रक्कम व त्यावरील व्याज याचा कसलाही हिशेब किंवा कपातीच्या पावत्या कर्मचाऱ्यांना मिळाल्या नाहीत वारंवार मागणी करुनही त्या मागणीकडे जाणून बूजून दुर्लक्ष करण्यात येत आहे. आणी आता ही( DCPS )अंशदायी पेन्शन योजना शासनाने बंद करुन त्याऐवजी (NPS )राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.
यामध्ये कर्मचाऱ्यांना समाविष्ठ होण्याची सक्ती करण्यात येत आहे प्रथम ( DCPS )अंशदायी पेन्शन योजनेचा हिशेब कर्मचाऱ्यांना देण्यात यावा त्यानंतरच (NCP )राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना समाविष्ठ होण्याची सक्ती करावी, DCPS चा क्लोजींग बॅलन्स व NPS चा ओपनींग बॅलन्स यासंदर्भात कर्मचाऱ्यांना माहिती मिळावी अशी मागणी DCPS कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
