आटपाडी/प्रतिनिधी : सध्या चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले असून ग्रामीण भागांमध्ये टू-व्हीलर पासून अगदी चारचाकी देखील चोरी होवू लागल्या आहेत. असाच प्रकार आटपाडी तालुक्यातील तडवळे गावात घडला आहे.आटपाडी तालुक्यातील तडवळे गावातील अभिजित औदुंबर गिड्डे (वय-28) रा. तडवळे ,ता. आटपाडी,जि. सांगली येथे वास्तव्यास असून त्यांची दि. ६ /२/२०२१ शनिवारी रात्रीच्या सुमारास चारचाकी गाडी चोरीला गेली आहे.

अभिजित गिड्डे यांनी आपल्या राहत्या घरासमोर गाडी पार्किंग मध्ये लावली असताना रात्रीच्या सुमारास त्यांची पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी नं. MH 45 .N.5686 बोलेरो ही गाडी चोरीला गेली आहे. रविवारी पहाटे गाडी न दिसल्याने अभिजित गिड्डे व त्यांच्या नातेवाईक यांनी गाडीचा सर्वत्र शोध घेतला मात्र गाडीचा कोठेही तपास न लागल्याने त्यांनी आटपाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद केली आहे.तरी सदरची बोलेरो गाडी आढळून आल्यास ९८६०७३६११५/९८६०५२४१९९ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
