जेईई मेन परीक्षेचे पहिले सत्र उद्यापासून
नवी दिली : जेईई मेनची पहिली परीक्षा मंगळवार 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 23 फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही परीक्षा 26 फेब्रुवारीपर्यंत चालेल. जेईई मेनची परीक्षा यावर्षी फेब्रुवारीच्या व्यतिरिक्त मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात देखील आयोजित केली जाईल. निश्चित कार्यक्रमानुसार जेईई मेन परीक्षेचे पहिले सत्र 23 ते 26 फेब्रुवारीदरम्यान आयोजित केले जात आहे. जेईईची परीक्षा आयोजित करणारी राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे वरिष्ठ परीक्षा संचालक साधना पराशर यांनी एक निर्देश जारी करून सांगितले कोरोना महामारीच्या दृष्टीकोणाने यावर्षी आयआयटीमध्ये प्रवेशासाठी 12 वी वर्गात 75 टक्के गुण प्राप्त करण्याची पात्रता असणारे मानदंड हटवले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालय जेईईची परीक्षा एक वर्षात चार वेळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या परीक्षांना इंग्रजीच्या व्यतिरिक्त हिंदी , बंगाली, गुजराती, मराठीसहित 13 विभिन्न भाषेतही घेण्याची तयारी आहे.
जेईई (मेन) 2021 मध्ये उपस्थित होण्यासाठी विद्यार्थ्यांना 16 डिसेंबर 2020 पासून 16 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी दिली गेली होती.
विद्यार्थी आगामी सत्रासाठी एक सत्राच्या निकालानंतर आपले अर्ज परतही घेऊ शकतील. या स्थितीत आगामी सत्रासाठी जमा केलेले शुल्क, एनटीएद्वारे परत घेतले जाईल. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी आगामी सत्रासाठी, एक सत्राच्या निकालानंतर आपले सत्रही बदलू शकतात.
जे विद्यार्थी परीक्षेच्या एकपेक्षा जास्त सत्रासाठी अर्ज करतात, तर ते प्रथम सत्रानंतर इतर सत्राच्या परीक्षेत उपस्थित होऊ शकतात आणि नाही देखील. याच्या व्यतिरिक्त जर कोणताही विद्यार्थी एक सत्रासाठी अर्ज करू शकला नाही, तर तो या सत्राच्या परिणामाची घोषणा केल्यानंतर त्वरित पोर्टल उघडल्यावर पुढील सत्रासाठी अर्ज करू शकतात.
एनटीएचे वरिष्ठ परीक्षा संचालक साधना पराशर यांनी एक नोटिसच्या माध्यमाने सांगितले. जेईई मेन आणि 12 वी ची बोर्ड परीक्षेचा दिनांक एकमेकांशी धकडू नये याला लक्षात ठेऊन विध्यार्थ्यांसाठी 3 मे पासून जेईई मेनसाठी अर्ज घेतले जातील. याचा अंतिम दिनांक 12 मे आहे. विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना आपला 12 वी वर्गाचा रोल नंबर आणि बोर्डची माहिती एनटीएला द्यावी लागेल.
यावर्षी जेईई ॲडवांस 2021 ची परीक्षा 3 जुलैला कंप्यूटर आधारित टेस्ट मोडमध्ये आयोजित केली जाईल.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज