मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळं मालवाहतूकदार अडचणीत सापडलेत. या धोरणानुसार 15 वर्षांवरील व्यावसायिक वाहनं आणि 20 वर्षांवरील खासगी वाहनं भंगारात काढावा लागणार आहेत. त्यामुळे हजारो मालवाहतूकदारांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसनं केलीय. या धोरणाचा पुनर्विचार करावा, अन्यथा देशभर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेनं दिलाय.

दरम्यान केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. नव्या स्क्रॅपेज धोरणामुळे धातूंचा पुनर्वापर करता येईल, वायू प्रदूषणात घट होईल, नवीन वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारेल. यामुळे आयात खर्च कमी होईल असे गडकरी यांनी आपल्या उत्तरात सांगितले. या धोरणाच्या मंजुरीनंतर भारतात ऑटोमोबाईल हब तयार होऊन वाहनांच्या किंमतीही कमी होतील असेही ते म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
