मुंबई: पुण्यातील भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात अचानक ‘ईडी’ने चौकशी सुरू केली. ‘मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्यानंतरच सक्तवसुली संचालनालय माझ्या मागे लागले. म्हणूनच ‘ईडी’कडून अटक होण्याची माझ्या मनात भीती आहे,’ असा युक्तिवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यातर्फे मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.
‘या प्रकरणात २०१६मध्ये एफआयआर दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून २०१८ मध्ये आरोपांत तथ्य नसल्याचे म्हणणारा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला. तोपर्यंत इडीचा या प्रकरणात कधीही हस्तक्षेप नव्हता. मात्र, मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होण्याचे ठरवून ऑक्टोबर-२०२०मध्ये तशी पावले उचलल्यानंतरच अचानक इडीचा या प्रकरणात शिरकाव झाला.
त्यापूर्वी इडीने मला कधीही चौकशीसाठी बोलावले नव्हते. म्हणूनच या तपाससंस्थेकडून चौकशीच्या नावाखाली अटक होण्याची भीती माझ्या मनात आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस