चेन्नई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आमचे पंतप्रधान देशाच्या हितांशी तडजोड करतील हे चीनला माहिती होते. गेल्या सहा वर्षांमध्ये भाजपा आणि संघाने देशातील विविध संस्था आणि फ्री प्रेसवर पद्धतशीरपणे हल्ला केला. तसेच मी भ्रष्ट नाही. त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.
यावेळी राहुल गांधी यांनी रिलायन्स आणि अदानीला मोदी सरकार फायदा पोहोचवत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, प्रश्न हा नाही आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपयुक्त आहेत की, व्यर्थ आहेत. पण मोदी हे दोन व्यक्तींसाठी खूप उपयुक्त आहेत. हम दो हमादे दो हे लोक पंतप्रधानांचा वापर आपली संपत्ती वाढवण्यासाठी करत आहेत. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपयुक्त आहेत आणि गरीबांसाठी निरुपयोगी आहेत, असा घणाघातही राहुल गांधी यांनी केला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस