अहमदनगर : भाजपने संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे राठोड यांच्या राजीनाम्यावरून सेनेतच दोन गट पडल्याची चर्चा आहे. शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून देखील या प्रकरणव प्रतिक्रिया येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्या मुलीला न्याय नक्की मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. रोहित पवार म्हणाले की, संजय राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे. अशा अनेक वेगवेगळ्या चर्चा होतात, मात्र त्या मुलीला न्याय हा नक्की मिळेल. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
