मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता सुयश टिळकच्या गाडीचा अपघात झाला होता. पण या अपघातातून सुयशला किरकोळ दुखापत झाली आहे. २८ फेब्रुवारीला पहाटे सुयशचा अपघात झाला. तो कॅबने प्रवास करत असताना अचानक एक मालवाहतूक गाडी त्याच्या गाडीला येऊन धडकली. त्यामुळे गाडी रस्त्यावरुन बाहेर फेकली गेली. सुदैवाने कॅब ड्रायव्हर आणि सुयशला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे नुकसान झाले.
सुयशच्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत वाऱ्यासारखी पसरली. यानंतर सुयशने स्वतः पोस्ट करून सुखरूप असल्याची माहिती दिली. ‘देव दयाळू आहे व जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे’, असे पोस्ट करीत सुयशने काळजी करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस