मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, पुढील महिन्यात होणारी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार, असल्याचे माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी अफवाना बळी पडू नये, असं आवाहनही मंडळाने केले आहे.
महाराष्ट राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने परिपत्रक काढत विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. कोविड संसर्गाच्या काळात परीक्षा सुरक्षित घेण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन सुरू आहे. मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही तारखात सध्या बदल नाहीत, असं शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यंदाच्या वर्षी 12वीची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होईल तर 21 मे रोजी 12वीचा शेवटचा पेपर असेल, तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल ते 29 मे या कालावधीमध्ये घेतली जाईल. 10वीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि 12वी च्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे.
कोरोनाची लागण झालेल्या किंवा क्वारंटाइनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी आधीच दिली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस