पुणे : शेतकरी आंदोलनाबाबत अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगन, विराट कोहली, रोहित शर्मासह अनेकांनी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील याबाबत ट्विट केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. भारतातील घटनांबाबत बाहेरच्यांनी हस्तक्षेप करू नये, अशा आशयाचे ट्विट सचिनने केले होते. त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्याच्यावर टीका करण्यात आली. आता शेतकरी आंदोलनाला विरोध करणाऱ्या सचिनचा भारतरत्न पुरस्कार परत घ्यावा, अशी आक्रमक भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.
सचिन तेंडुलकर नावाचा व्यक्ती शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खूपसून भाजपची सरकारची दलाली करण्यासाठी केंद्राच्या कृषी कायद्याचं समर्थन करतो आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करतो. हा करंटेपणा याच सेलिब्रेटी नावाच्या जातीत दिसून येतो. जर शेतकऱ्याने पेरलंच नाही तर ही सेलिब्रेटी मंडळी काय खाणार आहेत, अशी संतप्त टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे.
सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीने शेतकऱ्यांच्या पाठीशी आज खऱ्या खर्थाने उभा राहण्याची गरज असताना तो अशी शेतकरीविरोधी वक्तव्ये करतोय. त्याचा भारतरत्न काढून घेतला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
