सांगली : सांगली जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर 2020 कालावधीत मुदत संपलेल्या 152 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यापैकी 9 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता 143 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिह्यात 143 ग्रामपंचायतींमधील 551 प्रभागांमधील 1508 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये एकूण 1 लाख 68 हजार 226 स्त्री तर 1 लाख 73 हजार 373 पुरूष, इतर 11 असे एकूण 3 लाख 43 हजार 812 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 662 मतदान केंद्रे असून 153 निवडणूक निर्णय अधिकारी, 176 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 55 क्षेत्रिय अधिकारी 757 केंद्राध्यक्ष राखीवसह आहेत. मतदान अधिकारी नंबर 1, 2 व 3 साठी प्रत्येकी 757 मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिपाई 757 असून 91 बसेस, 61 जीप निवडणूक कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत.
या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी 7 पोलीस उपनिरीक्षक, 18 पोलीस निरीक्षक, 79 सहाय्यक पोलीस निरीक्षक / पोलीस फौजदार, 764 पोलीस कर्मचारी, 6 स्ट्रायकिंग, 2 प्लाटून एसआरपीएफ, 479 होमगार्ड, 86 वाहतूक कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
