नवी दिल्ली : भाजप खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीतल्या आरएमएल रुग्णालयाजवळ असलेल्या खासदारांची निवासस्थानं आहेत. त्यातल्या एका फ्लॅटमध्ये शर्मा यांचा मृतदेह आढळून आला. शर्मा यांचा मृतदेह फ्लॅटमध्ये फासाला लटकलेल्या स्थितीत सापडला. ते ६२ व्या वर्षी त्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये त्यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवला होता. हिमाचल प्रदेशातील एक हॉट सीट असणाऱ्या जागेवर त्यांनी विजय मिळवला होता.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस