मुंबई : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणार्याय पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या मालिकेसाठी IPLमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि राहुल तेवतिया यांना संघात संधी मिळाली.
सूर्यकुमार यादवला भारतीय संघात संधी देण्याबाबत माजी क्रिकेटपटू आणि चाहते बोलत होते. आयपीएल 2020 मध्ये शानदार कामगिरी करून सुद्धा सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नाही. तेव्हा चाहत्यांनी आणि माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. पण आता सूर्यकुमार यादवला इंग्लंडविरुद्धच्या टी -20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस