मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. शरद पवार यांना पोटात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आले होते. पण, पित्ताशयाचा त्रास अधिक जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
31 मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर पुढील 2 आठवडे ते घरीच विश्रांती करणार आहे, या काळात त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस