रत्नागिरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु केली जाणार आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होतील. तसेच, यावेळी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरु केली जातील अशी माहितीही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, यावेळी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक असेल, असे सामंत यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, युजीसीच्या गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जे महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच दिलेली आहे.
वसतीगृह टप्प्याटप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करुन वसतीगृहाचे इलेक्ट्रिक आणि सेफ्टी ऑडिट करुन घेण्यात यावे, असेही विद्यापीठांना सूचित करण्यात आलेले आहे. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफ लाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
