मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराच्या आरोपानंतर भाजप आक्रमक झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत भाजपच्या महिला मोर्चतर्फे राज्यभर आंदोलन केले. यावेळी मुंडे यांच्या राजीनाम्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी पुण्यात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, चित्रा वाघ, प्रदेश सचिव अर्चना डेहनकर, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकार आंदोलनात सहभागी झाले होते.
सामाजिक न्यायसारखे खाते सांभाळणारे धनंजय मुंडे हे स्वत:हून नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली. महिलांचा आदर ठेवून सन्मानाविषयी बोलणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुंडेंचा राजीनामा घेतील अशीसुद्धा अपेक्षा होती. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी उमा खापरे यांनी केली.
दरम्यान, पीडित महिला आणि तिच्या कुटुंबावर दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणात पुराव्यांशी देखील छेडछाड होऊ शकते, अशी शक्यता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
