मुंबई : राज्य सरकारने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 1 एप्रिलपासून वीज दर कमी होणार आहेत. घरगुती वीज दर 5 ते 11 टक्क्यांनी कमी होणार आहेत. महावितरण, अदानी, टाटा, बेस्ट ग्राहकांनाही फायदा होणार आहे. हे नवे दर पाच वर्षांसाठी लागू असणार आहेत. या नवीन वीज दराबाबत राज्य वीज नियामक आयोगाचे शिक्कामोर्तब केले आहे.
राज्य वीज नियामक आयोगाने राज्य सरकारच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार न पडू देता स्वस्तात वीज देण्याचं नियोजन केले आहे. वीज नियामक आयोगाने महागाईच्या काळात वीज दर कमी करण्याचा निर्णय गेतला आहे. घरगुती विजेच्या वापरात 5 ते 11 टक्के कपात करण्यात येणार आहे. नवे दर 1 एप्रिल 2021 पासूनच लागू होणार असल्यामुळे ग्राहकांना पुढच्या बिलापासूनच दिलासा मिळणार आहे.
आयोगाने जी दर कपात जाहीर केली आहे त्यानुसार राज्यातील विविध संवर्गासाठी वीज दरात सरासरी 7 ते 8 टक्के कपात सुचविली आहे. त्यानुसार महावितरणचे घरगुती वीज दर 5 ते 7 टक्क्यांनी कमी होणार आहेत. महाराष्ट्रातील उद्योगासाठीचे वीज दर तब्बल 10 ते 12 टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर शेतीसाठीचे वीज दर 1 टक्क्यांनी कमी होणार आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस