मुंबई : १५ फेब्रुवारीपासून माघी गणेशोत्सव सुरु होतोय. त्यासाठी राज्य सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मंडप उभारणीसाठी पालिकेची किंवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. मंडप मर्यादित आकाराचा असावा, आगमन-विसर्जन मिरवणुका काढता येणार नाही. सार्वजनिक मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती मूर्तीची उंची दोन फूट असावी, शक्य असल्यास धातूच्या किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

गणेशमूर्ती, मंडपाच्या आकारावर निर्बंध ठेवण्यात आले आहे. मंडपात एका वेळी 10हून अधिक कार्यकर्ते नसावेत, असं देखील राज्य सरकारने सांगितले आहे. तसेच माघी गणेशोत्सवात मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
