मुंबई : दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावर अमेरिकन पॉपस्टार सिंगर रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनमध्ये केलेल्या ट्वीटनंतर बॉलिवूड कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात अभिनेता अजय देवगणने केलेल्या ट्वीटवरून त्याला पंजाबी सिंगर जॅज धामीने ट्रोल केले आहे.“भारत किंवा भारतीय धोरणांविरूद्ध सुरु असलेल्या कोणत्याही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. अशा परिस्थितीत भांडण करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे” असे ट्वीट अजयने केले होते.

अजयच्या या ट्वीटला पंजाबी गायक जॅज धामीने रिट्वीट करत उत्तर दिले आहे. “चमचा, तुझ्यासाठी आरामात बसून ट्वीट करणे सोपे आहे. फक्त एक दिवस त्या कडाक्याच्या थंडीत तुझ्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांना पाठव मग तुला समजेल की ते कोणत्या परिस्थित राहत आहेत. दु:खाची गोष्ट म्हणजे रिहानासारख्या ग्लोबल स्टारने तुमचे डोळे उघडले” अशा आशयाच ट्वीट करत जॅजने अजयला ट्रोल केले आहे.
