कोलकाता : भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. रात्रीपासून त्याला अस्वस्थ वाटत होतं. दरम्यान दुपारी त्याच्या छातीत थोडं दुखू लागलं. प्रकृती बिघडल्याने कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात गांगुलीला दाखल करण्यात आलं आहे.
याआधी सौरव गांगुलीला २ जानेवारीला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
