आटपाडी : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या टीकेला उत्तर देताना “ए भाई, तू जो कोण असशील, माझ्या वर बोट उचलायचं न्हाय!” असा इशारा दिला. अमृता फडणवीस यांच हे ट्वीट त्यांनी वापरलेल्या भाषेमुळे चांगलेच चर्चेत आले.
परंतु आता मात्र अमृता फडणवीस यांचे हे ट्वीट रिट्वीट करत सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यात सुषमा अंधारे यांनी “वाह अमृता फडणवीस वाह.. काय हा माज.. काय ही दंडेलीची भाषा… गायकी पेक्षा मवालीगिरीत उत्तम करियर करू शकाल…! शिवाय मेकअप चा वेळ अन् खर्च ही वाचेल..!!! शुभेच्छा..” असे म्हणत शाब्दिक जोडे लगावले आहेत.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना भाई जगताप यांनी म्हणाले होते की, “राजीनामा मागणाऱ्या फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावे. भाई जगताप यांच्या याच ट्विटला रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी “ए भाई, तू जो कोण असशील, माझ्या वर बोट उचलायचं न्हाय!” असा रिप्लाय दिल्याने त्यांच्या भाषा शैली बद्दल अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
Join Free Telegram माणदेश एक्सप्रेस