मुंबई : ईडी आपल्यावरील आरोपांचा गैरवापर करत असून जो पर्यंत सुनावणी सुरु आहे, तोपर्यंत अटकेची कारवाई करु नये, यासाठी खडसेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड गैरव्यवहाराबाबत ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी अटक होण्याच्या शक्य्तेमुळे भारतीय जनता पक्षामधून नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेले खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. एकनाथ खडसे ईडीला चौकशीत सहकार्य करत असतील तर त्यांच्यावर अटकेची कारवाई कशासाठी, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं ईडीला केली आहे.
ईडीने राजकीय आकसापोटी तपास सुरू केला आहे. त्यामुळे ही फिर्याद रद्द करावी, अशी मागणी खडसे यांनी याचिकेत केली होती. चौकशीची व्हिडीओ शुटिंगही करण्यात यावी, अशीही मागणी केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस