जळगाव : एकीकडे महिलांचा सन्मान, महिलांना आरक्षण म्हणायचं आणि पदावर बसणाऱ्यांकडूनच महिलांवर अत्याचार होत असतील तर यापेक्षा दुःखाचा विषय महाराष्ट्रासाठी काय असेल ? राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे आपली महाराष्ट्रातली संस्कृती कुठे चालली आहे?, असा सवाल भाजप खासदार रक्षा खडसेंनी केला आहे.

महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात पुढे येत आहेत. त्यात काही मोठे लोक आणि मंत्र्यांसारख्या व्यक्तींचा सहभाग असल्याचं कळणे हा दुःखाचा विषय आहे. असेही राठोड यांचे नाव न घेता रक्षा खडसे म्हणाल्या.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
