मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोटात दुखू लागल्याने शरद पवार यांची तपासणी केली असता पित्ताशयात खडे झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं. बुधवारी त्यांच्यावर एन्डोस्कोपी करण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अनेकांकडून विचारपूस करण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोनवरुन चौकशी केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रकृतीबाबत चौकशी केली. त्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत मोदी यांचे आभार मानले आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस