मुंबई : रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर रिहानाला मूर्ख म्हटलं. त्यानंतर पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांज यानंही हा चान्स सोडला नाही.
दिलजीतने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं कंगनाला ‘पाल’ म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने कंगनाला टॅग केलं नाही परंतु अप्रत्यक्षपणे तिला टोला लगावला आहे. त्यासाठी त्याने एका पंजाबी म्हणीचा वापर केला आहे.
‘जात दी कोहड किर्ली, शातिरों के जफ्फे….’ असं त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. त्याच्या फॉलोवर्सनी त्याला याचा अर्थ विचारला, ज्यावर त्याच्या इतर फॉलोवर्सनी त्याचा अर्थ सुद्धा शेअर केला. युझर्सने लिहिलं- ‘जेव्हा क्षमता नसलेल्या किंवा कमी क्षमतेच्या व्यक्तीने मोठ्या गोष्टीची अपेक्षा करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एखाद्या पालीने घराच्या छपराच्या खांबाला चिकटण्याची स्वप्न बघण्यासारखं आहे.’
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
