आटपाडी : आटपाडीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचा राज्यात गौरव झाला असून महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजनेचे दोन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये महाविद्यालयाचे प्रा. धनंजय लोहार यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी तर, महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालय असे दोन पुरस्कार प्राप्त झाल्याने महाविद्यालयास संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, उपाध्यक्ष श्री. प्रा.कारंडे, श्री. पवार यांनी प्रा. धनंजय लोहार व महाविद्यालयाचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय लोंढे, प्रा. सदशिव मोरे, प्रा. विजय शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने महाविद्यालया बरोबरच शिवाजी विद्यापीठाचे नाव देखील उंचावले गेले आहे. राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना अंर्तगत पुरस्कार देण्याची प्रथा सन १९९३-९४ वर्षापासून सुरु आहे. त्यानुसार विद्यापीठांकडून प्रस्ताव मागविण्यात येतात. राष्ट्रीय सेवा योजने अंतगर्त सन २०१९-२० मध्ये निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगीकृत कामास प्रोत्साहन मळावे व त्यांच्या निस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्ट्टीने सदरचे राज्यस्तरीय पुरस्कार राज्य शासनाच्या वतीने देण्यात येतात.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस
Comments 1