सांगली : सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट सुरु असून शासनस्तरावर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्हा ग्रामीण क्षेत्रातसुध्दा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक काम सुरु आहे. सद्यस्थितीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपचारासाठी जिल्ह्यातील जी रुग्णालये बॉम्बे नर्सिंग होम रजिस्टेशन ॲक्ट 1949 (अमेंडमेंट) 2005 अंतर्गत नोंदणीकृत आहेत. अशी खासगी रुग्णालये कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी तात्काळ आरक्षित करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
यामध्ये आटपाडी तालुक्यातील श्री. सेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व आय.सी.यु सेंटर आटपाडी या ठिकाणी कोव्हिड रुग्णांसाठी आय.सी.यु व आयसोलेशन वार्ड त्वरित कार्यविन्त करण्यात करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. सदर रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यात यावेत त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या उपचार प्रणालींच्या मार्गदर्शन सुचनांच्या अधिन राहुन उपचार करण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस