सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान दत्तात्रय शिंदे यांचा मृतदेह आज सोमवारी सकाळी मोदी स्मशानभूमीलगत असलेल्या रेल्वे रुळावर आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
भगवान शिंदे हे सकाळी नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी जात होते. परंतु उशिरापर्यंत ती घरीच न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान मोदी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पुलावरून एक मृत्यदेह छिन्न-विच्छिन्न अवस्थेत पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेतला आणि रेल्वे हॉस्पिटलला घेऊन गेले तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. दरम्यान भगवान दत्तात्रय शिंदे यांनी साखर कारखान्यासाठी काढलेले भलेमोठे कर्ज घेतल्याने व त्या कर्जापोटीच त्यांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस