सोलापूर : रात्रीच्या अंधाराचा आणि घाटातून उतार असल्याचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींकडून( सातारा-पंढरपूर) रस्त्यावर पिलीव घाटात वाहनांवर तुफान दगडफेक होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री 4 ते 5 वाहनांवर तुफान दगडफेक झाल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यात माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा-पंढरपूर रस्त्यावरील म्हसवड जवळच्या पिलीव घाटात 10 ते 12 अज्ञात दरोडखोरांनी एसटी आणि मोटरसायकल चालकावर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या. मोटरसायकल चालक, बसमधील प्रवासी आणि बसचालक जखमी झाले. त्यानंतर या दरोडेखोरांनी गाडी थांबवत त्यावर ताबा मिळवला. तसेच, एसटीतील प्रवाशांना मारहाणसुद्धा करण्यात आली. या घटनेत एसटीच्या काचा फुटून मोठं नुकसान झालं.
झाडाच्या आड बसून 7 ते 8 चोरट्यांनी ही दगडफेक केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेनं पोलिसांनी संपूर्ण परिसरात जोरदार कोंबिग ऑपरेशन हाती घेतले आहे. लवकरच हल्लेखोरांना अटक करण्यात येईल, असा विश्वास साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी व्यक्त केला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
