मुंबई : तमिळ अभिनेता विरुत्छगाकांत यांचा बुधवारी 24 मार्च रोजी मृतदेह चेन्नईत एका ऑटो रिक्षात सापडला आहे. अनेक काळापासून फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या विरुत्छगाकांत यांचं निधन झाल्यामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने झोपेतच जगाचा निरोप घेतल्याचं समजतंय. मात्र अद्याप अभिनेत्याच्या मृत्यूच कारण स्पष्ट झालेलं नाही. मात्र अभिनेत्याची गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक स्थिती खालावलेली होती.
अभिनेता आई-वडिलांच्या निधनानंतर खूप निराश झाला होता. यानंतर त्याला सिनेमात काम मिळणं बंद झालं आणि संकटात आणखी वाढ झाली. परिस्थिती एवढी खालावली की अभिनेत्याला ऑटो रिक्षात राहावं लागत होतं. अनेकदा त्याला मंदिरांच्या बाहेर देखील पाहिलं आहे. यानंतर अभिनेत्याच्या आर्थिक स्थितीसोबत त्याची मानसिक आणि शारिरीक स्थिती देखील खालावली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस