मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्यानंतर दाक्षिणात्य अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवने आत्महत्या केली आहे. चंद्रशेखर एक उत्तम अभिनेता होता आणि मॉडेलही होता. खास गोष्ट म्हणजे चंद्रशेखरने वेब सीरीज वल्लमई थारायोमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. चंद्रशेखर श्रीवास्तवच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. चंद्रशेखर श्रीवास्तवचा मृतदेह त्याच्याच घरात लटकलेला आढळला.
चंद्रशेखर श्रीवास्तवने नेमक्या कुठल्या कारणास्तव आत्महत्या केली हे पूर्णपणे स्पष्ट झाले नाही. मात्र, असे म्हटले जाते की, चंद्रशेखर गेल्या काही महिन्यांपासून मानसिक त्रासातून जात होता. चंद्रशेखर या अनपेक्षित मृत्यूने नेटिझन्स हादरले आहेत. चंद्रशेखरच्या चाहत्यांना विश्वासच बसल नाही की, या जगात तो नाही.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
